जनतेज न्युज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाय घसरून पडलेल्या पोलीस कर्मचारी यांची केली विचारपूस

प्रतिनिधी, ठाणे : ठाणे अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू असताना मुख्यमंत्री निघण्याच्या वेळेस पोलीस कर्मचारी रूपाली साळुंखे यांचा तोल जाऊन पाय घसरुन पडल्या. त्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच एकनाथ शिंदे यांनी स्व:तहून पोलीस कर्मचारी रूपाली साळुंखे यांची विचारपूस केली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस शिपाई यांच्याबाबत दाखवलेल्या काळजी वरून पोलीस दलातून कौतुकाचा वर्षाव एकनाथ शिंदे यांच्या नावावर होत आहे.