प्रतिनिधी, नवी दिल्ली : कोर्टाचा नेहमी आदर सन्मान आहे. हनुमान चालीसा वाचल्यानंतर खोटे गुन्हे आमच्यावर मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन पोलीस आयुक्तांनी दाखल केले. त्याच्या विरोधात आम्ही हाय कोर्टात जाणार आहोत. वेळ आली तर सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ
नोटिस अचानक राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर का पाठवण्यात आली. एक एक वर्ष सहा सहा महिने चार्जशीट कोणाची दाखल होत नाही. अनेक महत्वाचे प्रकरणं महाराष्ट्रामध्ये आहेत. पण आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा प्रकरणात अचानक चार्जशीट दाखल करणे आणि कोर्टात दाखल होण्याची नोटिस देणे ही आम्ही कुठेतरी राज्यसभा निवडणुकीपासून दूर राहावं यासाठी केलं गेलंय.
