प्रतिनिधी, नवी मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या संकल्पनेतून आयोजित आयकॉनिक वीक दरम्यान भारतीय कस्टमने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे ड्रग डिस्ट्रक्शन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या दरम्यान 1064 किलोग्रॅम मेथॅम्फेटामाइन, 238 किलोग्रॅम मेफेड्रोन, 483 किलोग्रॅम इफेड्रीन आणि 204 किलोग्रॅम मॅड्राक्स हे अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांची विल्हेवाट लावत नष्ट करण्यात आले. यावेळी एकूण 2043 किलोग्राम वजनाचे एकूण ड्रग डिस्ट्रक्शन करण्यात आले असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत तब्बल 215 कोटी इतकी आहे.
