प्रतिनिधी ,औरंगाबाद ; सोलापूर विभागीय स्तरावर केले .अनेक वेळा राज्यातील विविध इंग्रजी शाळा संघटनांनी मोर्चे आंदोलने करूनही शासनाकडे इंग्रजी शाळांचा मागण्या प्रलंबितच आहे
त्यामध्ये RTE प्रतिपूर्तीची थकित रक्कम मिळावी ; सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पालकांनी शाळेची फीस भराणा करण्याबाबत शासनाने तातडीने परिपत्रक निर्गमित करावे ; विना टी .सी. प्रवेश परिपत्रक रद्द करा ; शाळा इमारतीस लाईट बिल व मालमत्ता करात 50% सवलत देवून कोरोनाकाळातील 100% माफ करा ; स्कूल बस टॅक्स रद्द करावा ; सवलत देवूनही वर्षभर फीस न भरणाऱ्या पालकाच्या पाल्याचा प्रवेश रद्द करून शाळांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत शासन अध्यादेश काढावा ; शाळेशी संबध नसलेल्या व्यक्तिंना शाळा प्रवेशबंदी करुन सरंक्षण कायदा करावा ; RTE प्रतिपूर्ती रक्कम शाळेच्या फीस प्रमाणे व कायदयानुसार वर्षातून दोन टप्यात विनाअट मिळावी ; RTE अंतर्गत मोफत शिक्षण नर्सरी ते इयत्ता 12 वी पर्यंत करावे .आदीसह 12 मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यांसाठी आज औरंगाबादेत म्हसनात नेवू नका या नाटकातील यमदुत व इतर पात्राची रंग व वेशभुषा करून विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना मेसा इंग्रजी शाळा संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले,
यामध्ये अध्यक्ष प्रल्हाद शिंदे – हस्तेकर , सरचिटणीस प्रविण आव्हाळे , उपाध्यक्ष नागेश जोशी , हनुमान भोंडवे जिल्हाध्यक्ष रत्नाकर फाळके जिल्हा सचिव विश्वासराव दाभाडे ; राजेश लिंबेकर शहराध्यक्ष सुनिल मगर , सचिन पवार् ; संतोष सोनवणे ; माहिला प्रमुख सौ .मोनाली महालपूरे , सौ सुरेखा माने* आदींचा सहभाग होता
निवेदन देतांना शिष्टमंडळ व इतरांनी कोरोना प्रादूर्भाव होवू नये यासाठी मास्क , सॅनिटायझर ‘ व सुराक्षित अंतराची काळजी घेण्यात आली
वेळोवेळी झालेले आंदोलन यशस्वी करण्यासाठी संजय पाटील , पोपट खैरनार तुकाराम मुंढे ; दिपक कोठारी ; ; उमेश अहीरराव ; डॉ. अब्दुल्ला ; मंजूशा शुक्ला ; ; सौ मोनाली महालपूरे ; मनिषा जोशी ; सौ सांगोले ; भगवान पवार ; अशोक गोरे संजय कुलकर्णी ; अशोक गोरे ; संदीप लगामे पाटील ; लक्ष्मण पल्हाळ : प्रा . न्यायाधिश ; गणेश जाधव ; जगदीश देसले विवेक उकीरर्डे ; महेंद्रकुमार घुमरे आदींनी परिश्रम घेतले .
लवकरात लवकर शासनाने इंग्रजी शाळांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यातील सर्व इंग्रजी शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा आज मेसा , मेस्को , इसा , मेस्टा ( एफ ) इंग्लिश मिडियम स्कूल संघटना ; आरटीई फौन्डेशन आदीं संघटनांनी दिला आहे
