जनतेज न्युज

म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या ; २५ जणांवर खाजगी सावकारीचा गुन्हा

प्रतिनिधी, सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे एकाच घरातील नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. डॉ. माणिक वनमोरे घरात सहा मृतदेह तर निवृत्त शिक्षक पोपट वनमोरे यांच्या घरात तीन मृतदेह मिळून आले आहेत. या सामूहिक आत्महत्येचा घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला आहे. आत्महत्या केलेल्या पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिठी सापडली असून, या चिठीच्या आधारे पोलिसांनी 25 जणांवर  खाजगी सावकारीचा गुन्हा मिरज ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.यातील 13 सावकारांना स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. यातील काही जणांवर यापूर्वीही सावकारीचा गुन्हा दाखल झाला होता.यातील काही जणांना हद्दपार करण्यात आले होते. आत्महत्या केलेल्यांमध्ये निवृत्त शिक्षक पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), डॉ. माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वन (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे. या सामूहिक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी रात्री  नंदकुमार रामचंद्र पवार वय 52 राहणार नदीवेस म्हैसाळ,  राजेंद्र लक्ष्‍मण बन्ने वय वर्षे 50 राहणार म्हैशाळ, अनिल लक्ष्मण बन्ने, वय वर्षे 35 माळेवाडी नरवाड, खंडेराव केदारराव शिंदे य वर्ष 37  डॉक्टर तात्यासो अप्पांना चौगुले वय वर्षे 50 राहणार मैशाळ, शैलेश रामचंद्र धुमाळ वय 56, प्रकाश कृष्‍णा पवार वय वर्षे 45 राहणार बेडग, संजय इरापा बागडी वय वर्षे 51 राहणार  म्हैसाळ,अनिल बाबू बोराडे वय वर्षे 48 राहणार मैशाळ, पांडुरंग श्रीपती घोरपडे वय वर्ष 56,म्हैसाळ शिवाजी लक्ष्मण कोरे वय वर्षे 65 राहणार मैशाळ, रेखा तात्या चौगुले वय वर्षे 45 रा म्हैसाळ 13 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.आणखी सावकारांना अटक करण्यासाठी एकूण सात पथके रवाना करण्यात आली आहे.