जनतेज न्युज

येत्या 26 जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास संसदीय कार्यकारणी चा राजीनामा देणार – खासदार गोपाळ शेट्टी.

प्रतिनिधी , त्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्पष्टपणे उल्लेख करत थेट इशारा दिला आहे जर का मुंबईतील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्न मार्गी लागला नाही तर ते आपल्या संसदीय कार्यकारिणीचा राजीनामा देतील.
राजीनामा दिल्यानंतर ते मोकळेपणाने हा लढा लढू शकणार असल्याचे सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले.
2014 साली नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा सत्तेत आले त्यानंतर त्यांनी सर्वांना घरे मिळण्यासाठी कायदा केला त्यानंतर महाराष्ट्र मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्याने त्यांनी सुद्धा सर्वांना घरे मिळण्यासाठी पाऊल उचलले परंतु अजूनही कोणत्याही प्रकारे झोपडीधारकांना पूर्णपणे न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले