जनतेज न्युज

येवल्यात टोमॅटो पिकावर टिपक्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव….उत्पादनात 50 टक्‍क्‍यांनी घट ….

प्रतिनिधी , येवला येवला : तालुक्‍यात अनेक ठिकाणी टोमॅटो पिकाची लागवड करण्यात आली आहे . रिमझिम पाऊस पडत असल्याने हवेतील आर्द्रतेमुळे टोमॅटो पिकावर काळा टिपका तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे टोमॅटो उत्पादनात 50 टक्क्यांनी घट झाली आहे. तालुक्यातील बल्हेगाव येथील शेतकरी किरण जमधडे यांनी दीड एकर मध्ये टोमॅटोचे पीक घेतले आहे.पीक निघण्यास सुरुवात झाली मात्र ढगाळ वातावरणामुळे व सतत पडत असलेला रिमझिम पाऊसमुळे हवेत आर्द्रतेमुळे टोमॅटो पिकावर काळा टिपका तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने या शेतकऱ्याच्या टोमॅटो पिकाची पन्नास टक्के घट झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. या शेतकऱ्याला 2000 कॅरेट टिकण्याची अपेक्षा होती मात्र या रोगाचा प्रादुर्भावामुळे पन्नास टक्के उत्पादनात घट झाल्याने 1000 कॅरेट निघतील अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
यासंदर्भात कृषी अधिकारी हितेंद्र पगारे यांच्याशी संपर्क साधला असता शेतकरी वर्गाने घाबरून न जाता कृषी सल्ल्यानुसार टोमॅटो पिकावर औषध फवारणी केल्यास काळा टिपका रोग व करपा रोग आटोक्यात येऊ शकतो अशी प्रतिक्रिया कृषी अधिकारी हितेंद्र पगार यांनी दिले आहे.