जनतेज न्युज

येवल्यात शहरातील समस्यांबाबत काँग्रेसचे जागरण- गोंधळ आंदोलन….. …समस्यांबाबत नगरपालिकेला जागृत करण्याकरिता केले जागरण-गोंधळ..

प्रतिनिधी , येवला : येवला शहरातील विविध समस्यांबाबत नगरपालिकेला जागृत करण्यासाठी येवला शहर काँग्रेस व तालुका कमिटीच्या वतीने जागरण गोंधळ घालत आंदोलन करण्यात आले .शहरातील नादुरुस्त रस्ते त्वरित दुरुस्त करावे ,घरपट्टी व पाणीपट्टी वसुली व कर आकारणी कमी करावी, शहरातील बंद असलेले पथदिवे सुरू करावे, शहराततील स्वच्छता दूर करावी, अमरधाम मध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा विविध मागण्या करता शहरातील समस्या बाबत नगरपालिकेला जागृत करण्याकरिता काँग्रेसच्या वतीने शहरातील मुख्य चौकांमध्ये जागरण गोंधळ घालत आंदोलन करण्यात आले.