जनतेज न्युज

रक्तदान शिबिराचे आयोजन करून सेवानिवृत्त अधिकार्याना आगळी वेगळी भेट..

प्रतिनिधी , कोरोणाच्या काळा पासून रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे ही जाणीव लक्षात घेऊन कोरोनाच्या काळात जे RFO दर्जाचे अधिकारी सेवानिवृत्त झाले त्यांचा निरोप समारंभ होऊ शकला नव्हता,तेव्हा सामाजिक जाणीव ठेवून सेवानिवृत्त समारंभ निमित्त रेंज फॉरेस्ट ऑफिसर व इतर अधिकाऱ्यांनी रक्तदान करून सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना आगळी वेगळी भेट दिली.यावेळी 50 च्या वर अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान केले.यापुढे दर वर्षी सेवानिवृत्ती निमित्त रक्त दान शिबिराचे आयोजन केले जाईल असा निर्णय रेंज असोसिशन च्या वतीने घेण्यात आला.त्यांच्या या निर्णयाचा सर्व स्तरातून गौरव होत आहे.