जनतेज न्युज

राजमुद्रा स्पोर्टस क्लबच्या वतीने परिजात येथील उद्यान खुले करण्यात यावे या मागणीसाठी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

प्रतिनिधि , औरंगाबाद : कोरोनाच्या महामारीमुळे 23 मार्च 2020 पासून परिजात येथील उद्यान महानगरपालिकेने बंद केले होते ते परत सुरू करण्यात यावे. या मागणीसाठी राजमुद्रा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयुक्तांना निवेदन दिले आहे. गेल्या दहा महिन्यांपासून हे ग्राउंड बंद आहे त्यामुळे राजमुद्रा स्पोर्ट्स क्लब चे विद्यार्थ्यांना कबड्डी खेळण्यासाठी या ठिकाणी कोणतेही ग्राउंड उपलब्ध नाही त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रीय आंतराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आहे यामुळे सरावा करण्यासाठी परिजात येथील उद्यान खुले करण्यात यावी अशी मागणी राजमुद्रा क्लबच्या वतीने केली.