पाऊस साधारण आणि पीक परिस्थिती ही साधारण,
भेंडवळ येथे घटमांडणी करीत भाकित वर्तविले आहे…
प्रतिनिधी , बुलडाणा : देशासह राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणाऱ्या भेंडवळची भविष्यवाणी आज पुन्हा जाहीर झालीय.अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान याबाबतचा अंदाज वर्तवला जातो.यंदा मात्र लॉकडाऊनमुळे मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत घटमांडणी करून त्यातून झालेल्या हालचालीवरूर्न भविष्यवाणी जाहीर करण्यात आलीय… त्यानुसार यावर्षी पाऊस हा सर्वसाधारण राहणार असून देशावर, महामारी आणि आर्थिक संकट येणार आहे..
गेल्या ३५० वर्षांपासून भेंडवळ येथे भविष्यवाणी वर्तवण्यात येते.यंदा लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडीत होऊ नये म्हणून केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजांसह पाच लोकांनी अक्षय तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली आणि आज सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार या वर्षीचे भाकीत वर्तविले.त्यानुसार यंदा राज्यात साधारण पाऊस पडेल. तर शेतीचे पीकही साधारण राहील.देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील, अशी भविष्यवाणी यावेळी वर्तविण्यात आलीय. देशाची आर्थिक स्थिती याही पेक्षा कमकुवत होण्याचा अंदाजही या भविष्यवाणीत वर्तवण्यात आला आहे.तर पावसाबाबत जून महिन्यात पाऊस साधारण पडेल. जुलै महिन्यातील पर्जन्यमान चांगले असेल. तर ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कम असेल. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी राहणार आहे.
फायनल व्हिओ – कोरोना च्या पार्श्वभूमीवर भेंडवळची घटमांडणी उपस्थितीत माध्यमांवर जाहीर करण्यात येईल, अशा घोषणेनंतर आज सारंगधर महाराज यांनी ही घोषणा केलीय.. मात्र संपूर्ण देश कोरोनाचे संकट झेलत असताना हे महामारी संकट आणखी गडद होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं चिंतेत वाढ झालीय..
