जनतेज न्युज

खंडित विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा ….

प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शेवडी बाजीराव इथल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आत्मदनाचा इशारा दिलाय .शंभर टक्के ओलिताखाली असलेल्या या गावातील सर्वच शेतकऱ्यांनी विद्युत बिलांचा वेळेवर भरणा केलाय. मात्र इथल्या शिवारातील कृषिपंपाला 24 तासांपैकी अवघा एक ते दोन तासच विद्युत पुरवठा होतोय. त्यामुळे उन्हाळी पिकांना वाचवणे अशक्य बनलंय, मुबलक पाणी असूनही विद्युत पुरवठ्याअभावी इथले पिके वाळून जातायत. काही शेतकरी जनरेटर, आणि इंधन पंपाचा वापर करून पिके वाचवण्याचा खर्चिक प्रयोग करतायत, मात्र त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होतंय. लोहा तालुक्यातील सोनखेड उपविभागात महावितरणच्या कार्यालयात अपुरे मनुष्यबळ आहे, त्यातून महावितरणच्या अनागोंदीला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय.