प्रतिनिधी , उस्मानाबाद : कोरोणा संसर्गाच्या पहिल्या लाटेत टेस्ट करणे अवघड झाले तेव्हा लोकसहभागातुन विद्यापिठ उपकेंद्रात प्रयोग शाळा सुरू करण्यात आली. मात्र केवळ २५०ते ३०० तपासण्या शक्य होत्या.
या प्रयोगशाळेचे अधुनिकीकरण व विस्तारीकरणसाठी जिल्हा नियोजन समितीतुन १ कोटीची तरतुद करण्यात आली .आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार , आरोग्यमंत्री राजेश टोपे , पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत डिजीटल व्हर्च्यूवल बैठकीत शुभारंभ करण्यात आला.
या वेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर , मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड , जिल्हा पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन व कर्मच्यारी उपस्थित होते.
या प्रयोगशाळेमुळे कोरोणा रिपोर्ट तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे.
