प्रतिनिधी , बीड : कोरोना सारख्या संकटात बीड जिल्ह्यातला शेतकरी होरपळून निघत आहे. असं असताना शेतकऱ्यांनी लाखोंचा पीक विमा भरला मात्र नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप विमा मिळाला नाही. तांत्रिक अडचणी दाखवून विमा भरपाई नाकारली जातेय. त्यामुळे विमा कंपनी आणि जिल्हा प्रशासनाचं साटेलोटे असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे. सत्ताधार्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्यावा अशी मागणी देखील कुलकर्णी यांनी यावेळी केली आहे.
