जनतेज न्युज

राज्य सरकारच्या अल्टिमेटम नंतर देखील एस्टी कर्मचारी संपावर ठाम

प्रतिनिधी, मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी संपावर गेलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना शेवटची डेडलाईन दिली आहे. परीक्षा सुरू आहे. विद्यार्थ्यांना एसटीची गरज आहे. अनेक विद्यार्थी अडचणीच्या भागातून येतात. त्यांना दुसरं वाहन परवडत नाही, त्यामुळे एसटी कामगारांना विनंती आहे की त्यांनी कामावर परतावं. जे निलंबित झालेत, ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याची संधी दिली आहे. 31 मार्च पर्यंत कुणाचं न ऐकता, आत्महत्येचा विचार न करता पुढे यावं आणि एसटीत रुजू व्हावं. तसेच आपलं आपलं काम सुरू करावं. तरी आझाद मैदानात एसटीच्या कर्मचाऱ्यांची संपावर ठाम आहेत