जनतेज न्युज

राज्य सरकारी कर्मचार्यांचा देशव्यापी लाक्षणिक संप…

परवानगी नसल्याचे कारण देत आंदोलन पोलिसांनी दडपले…
नविन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागु करावी…

अँकर- राज्य शासकीय कर्मचारी नविन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागु करावी आणि सेवा निवृत्ती कर्मचारी वय 60 करावे या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज बुलडाण्यातील राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलाय.मात्र आंदोलनाला परवानगी नसल्याचे कारण सांगत पोलिसांनी सुरु असलेले आंदोलन दडपलेय.या लाक्षणिक संपात शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.अंशदायी पेन्शन योजना बंद करा जुनी पेन्शन योजना पूर्वत सुरू करा. केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही भत्ते द्या. अनुकंपा तत्वावरील नोकरी विनाअट द्या… कंत्राटीकरण खाजगीकरण रद्द करा या व अन्य मागण्या याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटनांनी संपामध्ये विविध कर्मचारी सहभागी झाले होते. आज आंदोलन असल्यामूळे शासकीय कार्यालय ओस पडली आहे.