जनतेज न्युज

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

प्रतिनिधी , औरंगाबा्द- महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्यावर शिवसेनेसह विविध पक्ष, संघटना, तसेच शिवसैनिक व समर्थकांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करीत साद्या पद्धतीने शहरातील शिवसेना भवन येथे ना. अब्दुल सत्तार यांनी शुभेच्छाचा स्वीकार केला.
दरवर्षी ना. अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो.
सेना भवन येथे नॅशनल सूतगिरणी चे संचालक राजेंद्र ठोंबरे व मित्र मंडळाच्या वतीने पेडा तुला कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता. यावेळी प्रशासकीय, नगरसेवक, विविध सामाजिक संघटना, व पक्ष पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.