जनतेज न्युज

राज्यसरकारने आणि पोलीसांनी आपले धोरण बदलावे – चित्रा वाघ

प्रतिनिधि , मुंबई : आज नाशिकमध्ये एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचारात वाढ झाली आहे.यावर भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी,’राज्यातले वाढते बलात्काराचे प्रमाण पाहता राज्यातले सरकार अश्या बलात्काऱ्यांना अभय आणि संरक्षण देण्याचे काम करत आहे.आपण सर्वांनी औरंगाबादच्या प्रकरणात पाहिले आहे.राज्यसरकारच्या या सगळ्या धोरणामुळेच कुठेतरी विकृत्यांचं मनोबल वाढताना दिसत आहे.त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा धाक,भीती राहिलेली नाहीये.त्यामुळे जर सरकारने आणि पोलीसांनी ही जर भूमिका बदलली नाही,तर राज्यात कितीही कायदे आणले तरी राज्यातल्या महिलांची सुरक्षा कोणीही करू शकणार नाही,असे मत चित्रा वाघ यांनी मांडले आहे.