जनतेज न्युज

राशनचे धान्य मिळवण्यासाठी हिरडीच्या ग्रामस्थांचे आमरण उपोषण.

प्रतिनिधी , हिंगोली : गेल्या सहा महिन्यांपासून राशनचे धान्य न मिळाल्यामुळे हिंगोली तालुक्यातील हिरडी येथील ग्रामस्थांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. येथील स्वस्त धान्य दुकानाची व्यवस्था नजीकच्या धानोरा गावातून सुरू आहे परंतु गावकऱ्यांना या दुकानदाराकडून धान्य वाटप केले जात नाही, अशी तक्रार या गावकऱ्यांनी केली होती. परंतु प्रशासनाने आश्वासन देऊन देखील अद्याप यावर कोणतीही कारवाई केली नाही. आता आम्हाला लवकरात लवकर राशनचे धान्य उपलब्ध करून द्या, तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.