जनतेज न्युज

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले.

प्रतिनिधी , औरंगाबाद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रांती चौक येथे जन आंदोलन करण्यात आले यावेळी पदाधिकाऱ्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला उपस्थिती होती केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे की केंद्र सरकारने जे कृषी कायदे केले आहे ते रद्द केले पाहिजे गेल्या 37 दिवसापासून शेतकरी रस्त्यावर बसून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे केंद्र सरकार हे नुसतं चर्चा आणि चर्चा करत आहे त्यामुळे चर्चा न करता कृषी कायदे रद्द करण्यात यावी अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात मोठे जनआंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले