प्रतिनिधी , भाजपा युवा मोर्चाचे राबोडी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन पाहणी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर महिलेवर अत्याचार झाल्याचा गुन्हा औरंगाबाद येथे दाखल झाला आहे.त्यांना अटक करावी या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आले होते .परंतु महेबूब शेखवर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.असे असताना देखील भाजपा युवा मोर्चा ठाणे शहर यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या आंदोलनाला उत्तर म्हणून कॅसल मिल येथील आंबे घोसाळे तलावाबाहेर ” मेक इन इंडिया नाही भाजपाचा रेप इन इंडिया” अशा आशयाचा बॅनर लावून त्यावर भाजप नेत्यांची नावे टाकली आहेत त्यामुळे भाजपाची बॅनर लावून विनाकारण बदनामी राष्ट्रवादी युवक काँग्रेस करत आहे यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व सदरचा बॅनर त्वरित काढण्यात यावा या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने राबोडी पोलिसांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव ओमकार चव्हाण,ठाणे शहर अध्यक्ष सारंग मेढेकर,ठाणे संपर्कप्रमुख अमित पाटील,वर्तकनगर मंडळ अध्यक्ष ज्ञानदीप जाधव आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
