प्रतिनिधी , जालना- औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करायचं की नाही. याबाबत मी आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या मताशी सहमत असुन, सध्या हा कार्यकर्त्यांचा विषय आहे .औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करायचे आहे असं मुख्यमंत्री म्हणालेले नाही. जेव्हा हा विषय सरकारकडे चर्चेला येईल तेव्हा बसून ठरवू असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे . हे सरकार तीन पक्षांचं असून, पाच वर्षे चालेल. शहराचं नाव बद्दलण्यापेक्षा विकासकामांवर सरकारने लक्ष द्यावे. तिन्ही पक्षांमध्ये मतभिन्नता आहे. मात्र आमची कुस्ती भाजप आणि एमआयएम शी आहे. असंही चव्हाण यांनी सांगितलं.
