प्रतिनिधी, औरंगाबाद : शहरातील क्रांती चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने वाढत्या महागाईच्या विरोधात आणि पेट्रोल-डिझेल घ्यायच्या दरवाढी विरोधात मोठे आंदोलन आज रोजी करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसापासून पेट्रोल डिझेल गॅस चे दर वाढ मोठ्या प्रमाणात वाढले असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी केंद्र शासनावर ती मोठ्या प्रमाणात टीका केली असून केंद्र शासन महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत नसल्याचा आरोप त्यांनी आज रोजी केला आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे वरती आळा घालता येत नाही देशात पेट्रोल डिझेल गॅस चे मोठ्या प्रमाणात दर वाढ झाली असून याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज रोजी केंद्र शासनाच्या विरोधात एल्गार आंदोलन करण्यात आले आहे सदरील आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज रोजी देण्यात आली आहे.
