प्रतिनिधी , सांगली : कर्नाटकहून बारा चाकी ट्रकमधून जालनाकडे अवैधरित्या गुटखा घेऊन जात असताना कुरळप पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील येलूर फाट्यावर सापडला 23 लाखाचा गुटखा पकडला आहे.सांगली जिल्ह्यातील कुरळप पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.राजिक खान मन्नाखान पठाण असे वाहतूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी सांगली जिल्ह्यात रात्रीचे संचार बंदीच्या नियमांचे पालन करण्याकरिता वाहतूक नियम करून संशयित वाहनांची तपासणी करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्याने रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास कुरळप पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग येलूर फाटा येथे संचारबंदीच्या नियमांचे पालन व संशयित वाहन तपासणीचे काम चालू असताना कर्नाटकहून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होणार असल्याचे गोपिनीय माहिती मिळाली त्याचदरम्यान कोल्हापूर बाजूकडून एक बारा चाकी टाटा कंपनीचा ट्रक येत असल्याचा दिसल्याने त्याची तपासणी केली असता सदर ट्रक भोवती सुगंधी सुपारीचा वास आल्याने सदर ट्रकमधील भरलेल्या मालाविषयी ट्रकवरील चालकाकडे विचारणा केली व माल पहिला असता तो सुगंधी सुपारी गुटखा जन्य पदार्थ असल्याचा संशय आल्याने व सदरचा माल हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित आहे का याबाबत खात्री करण्यासाठी मलासहित ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आवारात आणून लावून सदर प्रथम पदार्थाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे 23 लाख 72 लाख सातशे बंदी असल्याने सदरचा प्रतिबंधित मुद्देमाल व वाहन मिळून सुमारे 43 ,72 ,700 /रुपयांच ा मुद्देमाल पुढील कारवाई कामी जप्त करण्यात आला.
