जनतेज न्युज

कळंबा कारागृहात फेकलेल्या 10 मोबाईल आणि गांज्याचे पिशव्या.

प्रतिनिधी , कोल्हापूर : कळंबा कारागृहात फेकलेल्या 10 मोबाईल आणि गांज्याच्या पाठीमागे नेमका कोणाचा हात होता शिवाय हे कोणासाठी आतमध्ये फेकले गेले याचा पोलीस तपास करत आहेत. लवकरच दोषी सापडतील आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी म्हटले आहे. शिवाय राज्यातील सर्वच कारागृहांमध्ये नवीन सीसीटीव्ही बसविण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे पाठविला असल्याचे सांगितले. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गांजा आणि मोबाईल प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस महासंचालक रामानंद यांनी कोल्हापुरातील कळंबा कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. शिवाय घटनेची संपूर्ण माहिती घेऊन उपायोजनांबाबत संबंधितांना सूचना दिल्या.