जनतेज न्युज

रिक्षा टॅक्सी यांची भाडेवाढ झाली पाहिजे परंतु पहिल्यासारखी मिळकत नाही – रिक्षा टॅक्सी चालक.

प्रतिनिधी , दिवसेंदिवस महागाई वाढत असतानाच आता इंधन दरवाढ या नंतर रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी सुद्धा आपली भाववाढ जाहीर केली आहे,
येत्या एक मार्च 2019 पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे भाडे वाढण्याची शक्यता आहे
नवीन करप्रणाली पाच अनुसार रिक्षा 18 रुपयापासून एकवीस रुपये टॅक्सी 22 रुपये पासून 25 रुपये, हे दर असू शकतात,
महागाईचा दर दिवसेंदिवस वाढतच आहे त्यातच कोरणा संक्रमणामुळे लोकांच्या रोजगाराचे प्रमाण कमी होत असतानाच आता त्यातच रिक्षा आणि टॅक्सी भाववाढीमुळे सामान्य मुंबईकरांना त्याचा मोठा फटका पडणार आहे.
रिक्षा टॅक्सी भाववाढ या प्रश्नावर रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रतिक्रिया विचारली असता असे कळाले की इंधन दरवाढीमुळे रिक्षा व टॅक्सी चालकांचे भाडे वाढणार आहे परंतु पूर्वीसारखे रिक्षा व टॅक्सी चालक यांचे उत्पन्न वाढले नाही महागाईमुळे ग्राहकांची रिक्षा व टॅक्सी चालक आणि पासून पळ काढताना दिसत आहेत.
यासोबतच किमान भाडे बस पाच रुपये त्यामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांना मोठ्याप्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे.
याबाबत काही रिक्षाचालकांनी शासनाने या प्रश्नावर तोडगा काढून रिक्षा व टॅक्सी चालक याची मदत करण्याची मागणी केली