प्रतिनिधी , उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पारधी समाजाच्या जात पंचायतीने सुनावलेल्या शिक्षा भोगतानाचा व्हीडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होताच या प्रकरणी पिडीत महीलेने समाज माध्यमासमोर येऊन गावातील एक व्यक्ती व परंडा पोलीसातील एक कर्मच्यारी यांनी आत्याच्यार केल्याची तक्रार करत सोलापुर पोलीसांना गुन्हा दाखल करण्याची विनंती केल्यावरून सोलापुर ग्रामीण पोलीसात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
पिडीतेच्या विनंतीवरून आरोपी भगवान धनवे व पोलीस कर्मच्यारी खुणे यांच्या विरूध्द अत्याच्याराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .व्हायरल व्हीडीओ प्रकरणी जात पंचायत निर्मुलन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
