जनतेज न्युज

विद्युत कायदा प्रेस – कॉम्रेड कृष्णा भोयर

महावितरणचा खासगीकरणाचा डाव! दिला बेमुदत संपाचा इशारा
प्रतिनिधी , कोल्हापूर : येत्या लोकसभेच्या अधिवेशनात नव्या सुधारित विद्युत कायद्याला मंजुरी मिळाली तर, देशभरातील जनतेच्या मालकिची असणारी महावितरण कंपनी खाजगीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. याला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉसिटी वर्कर्स फेडरेशन यांनी विरोध दर्शविला आहे. या कायदा संमत झाल्यास देशभरात कर्मचारी बेमुदत संप पुकारतील असा इशारा कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
राज्यातील जनतेला व वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळात जोखीम पत्करुन अविरत वीज पुरवठा केलेला आहे. म्हणून जनतेने व वीज ग्राहकांनी वीज कामगार व अभिंयते याना मारहाण करुन सरकारी मालमतेचे
नुकसान करु नये, असे आवाहन कॉम्रेड भोयर यांनी केले आहे. ग्राहकांनी वापरलेल्या वीजेचे बिल भरावे. राज्य सरकारला जर लॉकडाऊन काळातील किंवा १०० युनीट विजेचा वापर करणाऱ्या वीज ग्राहकांना वीज बिल माफ करायचे असेल तर महावितरण कंपनीस तेवढे अनुदान दयावे, ही मागणी वर्कर्स फेडरेशची आहे.असे कॉम्रेड भोयर म्हणाले.