जनतेज न्युज

रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकार्यालय समोर पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात घोषणाबाजी केली.

प्रतिनिधी , औरंगाबाद: गेल्या काही दिवसापासून पेट्रोल डिझेल आणि गॅस त्यांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची हाल होताना दिसत आहे
अनेक दिवसापासून दररोज होत असलेल्या पेट्रोल व गॅस दरवाढीने गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले असून आणि कोरो ना या महामारी मुळे संपूर्ण देशातील गोरगरीब जनतेची हाल होत आहे.
त्याचप्रमाणे केंद्र शासनाने गॅस दरवाढ प्रमाणे पेट्रोल चे भाव ना भूतो ना भविष्य असे दर वाढून टाकले आहेत पेट्रोलचे दर शंभर रुपये करून शतक ठोकले आहे आज जीवनामध्ये पेट्रोल हे जीवनावश्यक वस्तू झाली आहे त्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकार्यालय समोर चूल पेटवून स्वयंपाक केला तसेच बैलगाडी आणून पेट्रोल आणि डिझेल दरवाढ विरोधात निदर्शने केले .