जनतेज न्युज

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू ठाम पणाने मांडावी अशी मागणी खासदार संभाजी राजे भोसले यांनी केली आहे.

जालना:मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू ठाम पणाने मांडावी अशी मागणी खासदार संभाजी राजे भोसले यांनी केली आहे.सध्या मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यावर जास्त भाष्य करता येणार नाही.असंही त्यांनी स्पष्ट केलं.मात्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांची बैठक घेऊन वकिलांनी न्यायालयात मजबूत भूमिका मांडण्यासाठी सूचना कराव्या असंही त्यांनी सांगितलं. संभाजीराजे यांनी जालन्यातील साष्टपिंपळगाव येथे सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.