जनतेज न्युज

आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठासमोर हल्लाबोल आंदोलन.

प्रतिनिधी , औरंगाबाद: आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर हल्ला बोल आंदोलन केले.
मागील काही दिवसापासून विद्यापीठातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी आपल्या पद व अधिकाराचा गैरवापर करून पोलीस प्रशासनाने चुकीची माहिती देऊन आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे तसेच आंबेडकरी पक्ष व संघटनेच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याचे त्यांचा तीव्र निषेध करतो तसेच आंबेडकरी कार्यकर्ते नागराज गायकवाड यांनी विद्यापीठाच्या विद्यमान कुलसचिव डॉक्टर जयश्री सूर्यवंशी यांच्या नियुक्तीबाबत आक्षेप नोंदवून निष्पक्षपणे चौकशी करण्याची व पूर्ण होऊ पर्यंत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
खालील प्रमाणे काही मागण्या आंबेडकरवादी ने केले आहे
आंबेडकरी कार्यकर्ते नागराज गायकवाड व त्यांच्या सहकार्याने विरोधात दाखल खोटा गुन्हा काढून घेण्यात यावा
कुलसचिव डॉक्टर जयश्री सूर्यवंशी यांच्या बाबतच्या तक्रारीची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कुलसचिव पदावरून हटविण्यात यावे
आरक्षणावरून कंत्राटी तत्त्वावर शिक्षक संवर्गातील भरलेल्या जागा तात्काळ रद्द कराव्यात
राजकीय दबावापोटी थांबण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 125 भिम गीतांचा गीत भीमयान हा प्रकल्प तात्काळ पूर्ण करावा
अशा मागण्या आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने मुख्य इमारती समोर केले आहे