जनतेज न्युज

लॉक डाऊन लागला तरीही कापूस खरेदी सुरूच राहील:माजी मंत्री अर्जुन खोतकर

प्रतिनिधी , जालना: जालन्यात आज सीसीआयच्या कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली.बाजार समितीचे सभापती आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे.लॉकडाऊनचा निंर्णय जेव्हा व्हायचा तेव्हा होईल याबाबत मुख्यमंत्री निर्णय घोषित करतील ,पण लॉक डाऊन लागला तरीही कापूस खरेदी सुरूच राहील अशी माहिती शिवसेनेचे माजी मंत्री आणि बाजार समिती सभापती अर्जुन खोतकर यांनी दिलीय.आज विक्रीसाठी आलेल्या कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल भाव सीसीआयच्या वतीने देण्यात आला.