एसटी महामंडळाच्या बँकेची निवडणूक, राष्ट्रवादीविरोधात रणशिंग
प्रतिनिधी, मुंबई : एसटी महामंडळाच्या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे. एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे… या संघटनेच्या विरोधात सदावर्तेंनी घोषणा केलेली संघटना निवडणूक लढणार असल्याचं कळतंय. सदावर्तेंच्या राजकीय एन्ट्रीची ही पहिली पायरी तर नाही ना असा प्रश्न आता विचारला जातोय..
