प्रतिनिधी , हिंगोली : सामान्यांना भेडसावणार्या महागाईच्या प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव, घरगुती गॅस सिलेंडरचे वाढते भाव, अव्वाच्या सव्वा आलेली विज बिलं, आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांची वीज तोडणी आदी प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातून आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. महागाईचा निर्देशांक खाली जर खाली नाही आला तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे.
