प्रतिनिधी , विक्रोळी : विक्रोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी झालेली स्कॉर्पिओ ही आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेली स्कॉर्पिओ ही एकच असल्याची माहिती आता समोर येत आहे. विक्रोळी पूर्व दुरुस्ती मार्गवरून 18 फेब्रुवारी ही गाडी चोरीला गेली होती. ठाण्याच्या ऑटोमोबाईल व्यवसायिक मनसुक हिरेन यांची ही गाडी असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात हिरेन यांनी 18 फेब्रुवारीला विक्रोळी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. Mh 02 ya 2815 या क्रमांकाची ही गाडी आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारती बाहेर थोड्या अंतरावर एका स्कॉर्पिओ कार स्फोटकेसह आढळली होती. ही गाडी आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर 18 फेब्रुवारीला विक्रोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन चोरी झालेली गाडी एक असल्याची माहिती आता समोर आली आहे. फेब्रुवारीला पोलिसांत देण्यात आली होती. ठाण्याच्या एका आटोमोबाईल दुकान मालकाची असल्याची माहिती असून 17 तारखेला संध्याकाळी या गाडीचा मालक मुंबईत जात असताना ईस्टर्न एक्सप्रेस हाय वे वर ही गाडी बंद पडली होती. त्यामुळे ती गाडी तशीच त्या ठिकाणी उभी करून मालक निघून गेला आणि 18 तारखेला दुपारी एक वाजता मेकॅनिक ला घेऊन आला तर गाडी बेपत्ता झाली होती त्यावर विक्रोळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.पोलिसात तक्रार दिलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा नंबर
Mh 02 ya 2815 असा आहे त्यामुळे पोलीस आता या संदर्भात चौकशी करत आहे.मुंबई पोलिसांच एक पथक घटनास्थळी येऊन तपास करत आहे.
