जनतेज न्युज

विज बिलावर राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी -देवेंद्र फडणवीस यांच राज्य सरकारवर घणाघात

प्रतिनिधी , अमरावती : लॉकडाऊन मध्ये आलेली वीज बिल यात सवलत देऊ असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते मात्र यावर त्यांनी लोकांचा विश्वासघात केला तर राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती मध्ये शिक्षक निवडणूक प्रचार दरम्यान राज्य सरकारवर केली,तर हे सरकार घोषणा करते व त्यावर पलटते,लॉकडाऊन मध्ये सवलत देऊ या घोषणा वारंवार सरकारने केल्या तीन कॅबिनेट मंत्र्यांकडून ही घोषणा करण्यात आली असताना आता अभ्यास झाला नाही अस सांगत आहे त्यामुळे हे सरकार लोकविरोधी आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली