प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिलांबाबत नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करत कल्याण डोंबिवलीत भाजपतर्फे कल्याण पूर्व महावितरण कार्यलय ,पश्चिमेकडिल महावितरणच्या तेजश्री कार्यालय, डोंबिवलीतील महावितरण कार्यलयासमोर ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तेजश्री कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करीत भाजप कार्यकर्त्यांना रोखून धरले. यावेळी भाजपकडून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
