जनतेज न्युज

विजय तोडणीला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा ती स्थगिती उठवल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वीज माफ करण्याची शेतकऱ्यांची मागणी.

प्रतिनिधी , जळगाव : राज्यातील शेतकरी व घरगुती वीज वापर करणारे ग्राहक यांची होणारी वीज तोडणी अधिवेशनामध्ये वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी स्थगिती दिल्यानंतर विधान परिषदेत त्याच्यावर चर्चा न करता ती स्थगिती उठवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत आहे.
यावर्षी निसर्ग आपत्ती व आती पाऊस यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात शेती पिकापासून उत्पन्न आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे विज बिल माफ करावे असे मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, दोन वर्षापासून शेतामधले उत्पन्न झिरो आहे लावलेला खर्च देखील निघत नाही शेतीमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी कोणत्या हिशोबाने विज बिल भरतील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही वीज खंडित न करता विज माफी देण्यात यावी हॉर्स पावरच्या पंपावर प्रमाणे वीज आकारण्यात यावी असेदेखील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
विजय तोडणीला पहिल्या दिवशी स्थगिती दिली आणि शेवटच्या दिवशी ऊर्जा मंत्री यांनी सांगितले की ती आम्ही उठवली चर्चा कुठे झाली. असा कोणता शेतकरी आहे की त्याच्या पंप 24 तास सुरू असतो असा कोणता शेतकरी आहे 365 दिवस वापरतो इतर राज्यां सारख अश्वशक्ति वर आधारित घ्या आणि आम्हालाही सन्मानाने जगू द्या सरकारने शेतकऱ्यांचे प्रती थोडी संवेदना ठेवावी सगळ्यांना माफी मिळाली शेतकऱ्यांने एकट्याने काय पाप केले आहे असा प्रश्न महाराष्ट्र राज्य किसान क्रांतीचे समन्वयक एस बी पाटील यांनी उपस्थित केला आहे.