विजबिला संदर्भात माजी कृषिमंत्री आक्रमक.. अमरावतीमध्ये लॉकडाउन असताना गरिबांची विद्युत कापू नका- अनिल बोंडे
प्रतिनिधी , अमरावती : सद्या अमरावतीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. परिणामी जिल्ह्या प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन केलाय. या लॉकडाउनमुळे अनेकांची कामे थांबली असताना महावितरणचे कर्मचारी विद्युत बिलाची वसुली करताहेत. अमरावती जिल्ह्यातील सुरळी गावामध्ये महावितरणचे कर्मचारी विजतोडनी करिता दाखल झाले असताना त्या ठिकाणी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे पोहचले. त्यांनी अमरावतीमध्ये लॉकडाऊन असताना विजतोडणी का केली जाते अशी विचारणा करित महावितरणच्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले.. सोबतच ज्या नागरिकांची विजतोडणी केली ती जोडण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले.. आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना गावाबाहेर देखील काढले..
