जनतेज न्युज

धुळे जिल्ह्यातील तथाकथित मद्यसम्राट राजेंद्र ग लाईन वर गुन्हा दाखल करा, देशी दारू विक्री केंद्राच्या संचालिका शिल्पा शिंदे यांची मागणी.

प्रतिनिधी , धुळे : धुळे जिल्ह्यातील तथाकथित मद्यसम्राट राजेंद्र कलाने यांच्या धुळे शहरातील कुमार नगर भागात असलेल्या महाराष्ट्र लिकर या होलसेल देशी दारू विक्रेत्याकडून खरेदी केलेल्या देशी विदेशी दारुचे सेवन केल्यामुळे ग्राहकांना त्रास होत आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारी वरून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून भेसळयुक्त दारू बनावट करणाऱ्या तथाकथित मद्यसम्राट राजेंद्र गलाणी वर गुन्हा दाखल करा अशी मागणी राजेंद्र शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्र शिंदे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र लिकर चे मालक राजेंद्र गलानी हे धुळे जिल्ह्यातील गलानी पिता-पुत्र नामांकित तथाकथित मद्यसम्राट म्हणून ओळखले जातात. राजेंद्र गलाणी यांच्यावर बनावट दारूच्या संशयावरून अनेक वेळा कारवाई देखील झाली आहे. मात्र तरीदेखील शासनाकडून गलानी यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. गलाणी यांच्या बनावट दारुमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यामुळे त्यांच्या या बनावट दारुमुळे महाराष्ट्र शासनाचा महसूल देखील मोठ्या प्रमाणात बुडणार आहे. त्यामुळे सदर प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्या बनावट दारूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राजेंद्र शिंदे यांच्याकडून करण्यात आली.