जनतेज न्युज

पोहरादेवी गर्दी प्रकरणी मूख्य दहा जणासह अज्ञात १० हजार नागरीकावर गून्हे दाखल

प्रतिनिधी , वाशिम : पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या नंतर अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे काल आले होते.त्यांचे समर्थक येणार असल्यानं गर्दी होऊ नये म्हणून मानोरा पोलिसांनी येथील महंतांना नोटीस दिल्या होत्या.मात्र तरीही बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात पोहरादेवी येथे आल्यानं कायद्याचा भंग झाल्यामुळे मानोरा पोलिस स्टेशन मध्ये मुख्य दहा जनासह दहा हजार अज्ञात नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.मात्र ज्या महंतांना नोटीस देण्यात आल्या होत्या त्यांना वगळण्यात आल्यानं पोलिसांनी दबावात कारवाई केली का असा प्रश्न निर्माण झाला आहे…
पोहरादेवी येथील गर्दी केल्या प्रकरणी आयोजक असलेले महंत यांच्यावर गुन्हे दाखल न करता इतर नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या संदर्भात पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांना विचारले असता त्यांनी पोहरादेवी येथील महंतांनी आम्हाला मदत केली असल्याचे सांगितले तर वनमंत्री संजय राठोड यांच्यामुळे गर्दी झाली त्यामुळं संजय राठोड वर गुन्हे दाखल होणार असे विचारले असता त्यांनी बोलण्याचं टाळलं…..