प्रतिनिधी , विरोधी पक्ष विजबिलात सवलत देण्यासाठी आंदोलन, मोर्चे काढत आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही पेट्रोल, डिझेलचे दर कमी करत नाही, अशी टीका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलीय. संविधान दिनानिमित्त नागपूरच्या संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राऊत आले होते. यावेळी त्यांनी देशात दलितांवर अन्याय होत आहे, त्यांना देशात दुय्यम स्थान दिलं जातंय, त्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप दिली जात नाही, मात्र त्यांच्याबाबत कुणी बोलत नाही, दलितांबाबत केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विजबिलात माफी देण्याची मागणी विरोधी पक्ष करते आहे. मात्र, कोरोना काळात आम्ही।लोकांना मदत केली, शेतकऱ्यांना मोठी मदत केली. मात्र, कोरोनामुळं राज्याची तिजोरी रिकामी झाली. सर्व सोंग करता येतात, मात्र पैसाचे सोंग करता येत नाही, भाजप सरकारच्या काळात राज्याची तिजोरी खाली झाली, राज्य कर्जात बुडाले, असा आरोप करत जेंव्हा संधी मिळते तेव्हा आम्ही यातून मार्ग काढू, असं राऊत यांनी सांगितलं.
केंद्र सरकार gst चा जिधी देत नाही, दुष्काळग्रस्त भागात पथक पाठवत नाही, यावर विरोधी पक्ष बोलत नाही, सरकार पडण्याची भाषा ते करतात, मात्र त्यांचे आमदार दुसऱ्या पक्षात चालले असल्याने त्यांची चलबिचल होते आहे. आपले आमदार संभाळायची कुवत त्यांच्यात नाही अशी टीका करत भाजप विरोधी पक्षाचं काम चांगलं करत करत आहेत, ते त्यांनी करावं, म्हणजे राज्य अधिक चांगल्या पद्धतीने पुढं जाईल, अशी राऊत म्हणाले.
