प्रतिनिधी , कृषी विधेयक बिलावरून शरद पवार यांनी यू टर्न घेतला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ज्याठिकाणी शेतमालाचे भाव आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत जर विकले जात असेल तर त्यात केंद्राने सुधारणा करावी असं पवार साहेबांचं मत होतं. शरद पवार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूनेच विचार करत आलेले आहे,म्हणूनच शरद पवार साहेबांना शेतकऱ्यांचे नेते म्हटले जाते. मात्र आताच सरकार हे शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायलाही तयार नाही दिल्ली येथे शेतकऱ्यांच आंदोलन सुरू आहे सरकार त्या ठिकाणी खिळे ठोकून शेतकऱ्यांना अटकाव करत आहे ही काय देशात मोगलाई लागली काय असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला….
