जनतेज न्युज

शिक्षक निवडणुकीत ड्राय डे ला विरोध शिक्षक दारू पिऊन धिंगाणा घालतात का ? नितीन मोहोड यांचा संतप्त सवाल …

प्रतिनिधी , अमरावती: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची 1डिसेंबर रोजी निवडणूक होऊ घातली असून यासाठी शिक्षक निवडणुकी दरम्यान अमरावती जिल्ह्यात चार दिवस मध विक्री संदर्भात अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ड्राय डे घोषित केला आहे मात्र हा मात्र हा ड्राय डे अन्यायकारक असल्याचा आरोप अमरावती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी अमरावती घेतलेल्या पत्रपरिषदेत केला आहे, अमरावती जिल्ह्यात केवळ 12 हजार शिक्षक मतदार आहे मात्र या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवस दारूचे दुकान बंद ठेवण्याचे आदेश नुकतेच पारित केले आहे, मात्र शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत दारूचे दुकान बंद ठेवून इतर लोकांना वेठीस धरन्याचा हा प्रकार आहे असाही आरोप नितीन मोहोड यांनी केला वास्तविक पाहता विद्यार्थ्यांना चांगले संस्कार घडवणारे व देशाचे भविष्य शिक्षण घडवितात मात्र या निवडणुकीत शिक्षक दारू पितात व पार्ट्या करून धिंगाणा घालतात का ?व शिक्षक दारुडे आहे का?असा सवाल नितीन मोहोड यांनी अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना केला आहे.