जनतेज न्युज

शिक्षण मंत्री हटवण्यासाठी इंग्रजी संस्थाचालक संघटनेचे विभागीय आयुक्तांना निवेदन, 15 ऑगस्ट पासून आंदोलन तीव्र करणार

प्रतिनिधी ,औरंगाबाद: शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र इंग्रजी स्कूल संस्थाचालक संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री आणि आमदार नाना पाठवले आणि माजी आमदार कल्याण काळे यांना विभाग यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र इंग्रजी स्कूल संस्था चालक संघटनेच्या वतीने अनेक वर्षापासून विविध मागण्या असून मात्र शिक्षण मंत्री याकडे लक्ष देत नाही तर कोरुना संसर्गापासून इंग्रजी शाळांना खूप वाईट दिवस आले आहे राज्य शासनाने इंग्रजी शाळेत 25 टक्के गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश यांची भूमिका घेतली होती त्यासाठी शासन परतावा देणार होता मात्र आजपर्यंत कोणताच परतावा इंग्रजी शाळांना मिळाला नाही आताच्या शिक्षण मंत्र्यांना निर्णय घेता येत नसल्याने संस्थाचालक संघटनेच्यावतीने शिक्षण मंत्री हटाव ही मोहीम 15 ऑगस्टपासून तीव्र करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज यांच्यावतीने प्रदेश अध्यक्ष यांनी या वेळी हा इशारा दिला आहे.