प्रतिनिधी , भंडारा : भंडारा जिल्हयातील सीबीएसई शाळांच्या बोगस कारभारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याच्या मार्गावर आहे. त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जिल्ह्यातील पालकवर्गांने एकत्र येत ‘शिक्षा बचाओ आंदोलन समिती’ स्थापन करून, जिल्हयातील सीबीएसई शाळांमध्ये चालणाऱ्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी. तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी १८ डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला १० दिवस लोटुनसुध्दा जिल्हा प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने आज २८ डिसेंबर रोजी पालकांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सीबीएसई शाळांतील विद्यार्थी/विद्यार्थीनींनी शिक्षणाधिकारी यांना घेराव घालत शिक्षणाधिकारी यांना ‘शिक्षणाधिकारी काका आमच्या भविष्याचे काय? असा सवाल उपस्थित केला.या सत्याग्रहात शाळेतील लहान विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याने सर्वांच लक्ष याकडे वेधलं गेलं आहे.
