प्रतिनिधी , कराड: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज…. पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कराड मध्ये येणार आहेत. सकाळी साडे आठ वाजता कराड मधील कृष्णा कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर असणाऱ्या समाधी स्थळी जाऊन अजित पवार अभिवादन करणार आहेत. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई आणि विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत..
