जनतेज न्युज

शिवसेना यूपीएचा सदस्य नसल्यामुळे शिवसेनेने आपली प्रतिक्रिया देण्याची कुठलीही आवश्यकता नाही.

प्रतिनिधी , काँग्रेस पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना शेतकऱ्यांचा प्रश्न अतिशय योग्य प्रकारे हाताळता येतात आणि काँग्रेस पक्ष देशाला योग्य दिशा देऊ शकतो,असं मत काँग्रेस नेते नसीम खान यांनी व्यक्त केले आहे.
याचसोबत युपीएच्या अध्यक्ष पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पहिलेच सांगितले आहे की अध्यक्ष बदलण्याची कुठलीही चर्चा किंवा परिस्थिती सध्या नाही आहे. त्यामुळे यावर शिवसेनेने आपली प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, महाराष्ट्रात कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत काँग्रेसने शिवसेनेला महाराष्ट्रात पाठिंबा दिला आहे हे त्यांनी यूपी भाग नसल्यामुळे या संदर्भात कुठलेही भाष्य करणे गरजेचे नाही असे वक्तव्य काँग्रेस नेते नसीम खान यांनी केले आहे.