जनतेज न्युज

शेतकरी विरोधी कायदे रद्द होण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन ….

प्रतिनिधी , नंदुरबार : केंद्रातील मोदी सरकारने पारित केलेले तिन्ही शेतकरी कायदे रद्द करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व विविध संघटनेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले दिल्ली येथे देशातला शेतकरी न भूतो न भविष्यती असे आंदोलन करीत आहे केंद्र सरकारने लोकांच्या काळात शेतीसंबंधित तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत संख्याबळाच्या आधारावर मंजूर करून घेतले या नवीन विधेयकामुळे भारतीय शेतकरी अक्षरशहा नागवला जाणार असून तो देशोधडीला लागणार आहे जागतिकीकरण आणि त्यामागून अपरिहार्यपणे येणारा खाजगीकरणातून शेतकऱ्यांच्या शेतमाल कवडी मोलाने विकत घेण्याची मुभा आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नवीन विधेयकात आहे दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही धरणे आंदोलन पक्षाच्यावतीने करीत आहोत यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे ,मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे दत्तू साळवे आरपीआयचे नाना ठाकरे व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते…
अरुण रामराजे – जिल्हाध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी