जनतेज न्युज

अपुरा पाणीपुरवठा आणि पालिका प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या पाणी बिलाच्या निषेधार्थ चाळीमध्ये शोले स्टाईल आंदोलन करण्यात आला आहे.

शहरातल्या शामरावनगर या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून स्थानिक नागरिकांनी आणि सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी मिळून महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केला आहे.
प्रतिनिधी , सांगली : सांगली शहरातल्या उपनगर असणाऱ्या शामरावनगर या भागांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा सुरू आहे बरोबर पाण्यासाठी मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
तर सहा महिन्यातील पाण्याची बिलं ही भरमसाठ स्थानिक नागरिकांना पाठवण्यात आलेली आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या कारभाराच्या निषेधार्थ अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी येथील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढून
सत्ताधारी
भाजपा नगरसेविका नसीमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी हे आंदोलन केला आहे तातडीने नियमित पाणीपुरवठा करावा वाढीव पाण्याची बिले कमी करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या आंदोलनादरम्यान सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार यांनी भेट देऊन नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे शोले स्टाईल आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.